18 ऑक्टोबरला दिवाळीचा सण सुरु होतोय. त्याआधीच सरकारने जीएसटी कपातीचा निर्णय घेतलाय.
22 सप्टेंबरपासून जीएसटी कपात लागू होईल. ज्यामुळे गृहोपयोगी वस्तू स्वस्त होतील.
यानंतर दिवाळीत जोरदार खरेदी होईल. कारण लोकांना स्वस्तात सर्व सामान मिळणार आहे.
एसीवरील जीएसटी 28 वरुन 18 टक्के झालाय. तुम्ही 30 हजारचा एसी घेतलात.
यावर आधी 8400 रुपये जीएसटी होता. पण आता 5400 रुपये जीएसटी असेल. म्हणजे तुमचे 3000 रुपये वाचतील.
32 इंचापेक्षा मोठ्या टीव्हीवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आलाय. समजा तुम्ही 43 इंचाचा एलईडी टीव्ही 40 हजारला खरेदी केलात.
आधी तुम्हाला 11200 रुपये जीएसटी द्यावा लागायचा. पण आता 4200 रुपये जीएसटी द्यावा लागेल. म्हणजे तुमचे 4000 रुपये वाचतील.
फ्रीजवरील जीएसटीदेखील 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आला. समजा तुम्ही 25 हजारात फ्रीज खरेदी केलात.
जुना जीएसटी 7000 रुपये होता. आताचा जीएसटी 4500 रुपये आहे. म्हणजे तुमचे 2500 रुपये वाचतील.
याशिवाय दिवाळीला अनेक ऑफर्स असतात. ज्यामुळे किंमत आणखी कमी होतील.