सुर्याच्या आगीत का जळणार नाही आदित्य L1?

इस्त्रोने नुकतेच आदित्य एल 1 चे सुर्याच्या दिशेने यशस्वी प्रक्षेपण केले.

सुर्याच्या कक्षेच्या थोड्यावर (फोटोस्पेअर) चे तापमान साधारण 5,500 डिग्री सेल्सिअस आहे.

सुर्याच्या केंद्राचे तापमान 1.50 कोटी सेल्सिअसच्या जवळपास आहे.

इतक्या जास्त तापमानात कोणतेच यान तिथे पोहोचणे शक्य नाही.

यामुळेच यान सुर्यापासून ठराविक अंतरावर थांबते किंवा त्याच्या भोवती फिरते.

आदित्य एल 1 जितके तापमान ते सहन करु शकेल, सुर्याच्या तितक्याच जवळ ते जाईल.

आदित्य एल 1 ला आपल्या प्रवासात 15 लाख किलोमीटरचे अंतर पार करावे लागणार आहे.

सुर्यापासून 14 कोटी 85 लाख किलोमीटर अंतरावरील पृथ्वीवरुन आदित्य एल 1 ने उड्डाण घेतले.

एल 1 च्या चारही कक्षांमधून सुर्याचे निरीक्षण करणे हा आदित्या एल 1 चा उद्देश आहे.

सुर्यावरील वरच्या वातावरणाचा (क्रोमोस्फियर आणि कोरोना) डायनॅमिक्स, क्रोमोस्फेरिक आणि कोरोनल हीटिंग, अंशतः आयनीकृत प्लाझ्माचे भौतिकशास्त्र आणि कोरोनल मास इजेक्शनच्या सुरुवातीचा अभ्यास केला जाईल.

VIEW ALL

Read Next Story