एक कॅब ड्रायव्हर करोडोंची कंपनी बनवू शकतो असे कोणालाही वाटेल. अनेकजण अडचणींवर मात करून यशाची चव चाखतात, पण कथा अशाच लोकांच्या बनतात, जे प्रवाहाविरुद्ध जाऊन यश मिळवतात.आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर मुकेश मिकी जगतियानी यांनी 40 हजार कोटींची कंपनी बनवली.

Oct 30,2023


सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक संकटाचा डोंगर कोसळला. आणि मुकेश मिकी जगतियानी यांचे निधन झाले, धक्का सहन करत त्यांच्या पत्नी रेणुका जगतियानी यांनी तीन मुलांची जबाबदारी एकट्याने सांभाळत नवे यश संपादन केले.


रेणुका जगतियानी यांनी पराभव स्वीकारला नाही,पतीच्या मृत्यूचा धक्का आणि तीन मुलांची जबाबदारी पार पाडत त्यांनी कठीण काळात व्यवसाय तर सांभाळलाच आणि त्याला यशस्वी देखील बनवला.


फोर्ब्सच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा 44वा क्रमांक आहे. त्यांनी 40 हजार कोटी रुपयांची कंपनी केवळ ताब्यात घेतली नाही तर ती एक फायदेशीर कंपनी बनवली.


मुकेश मिकी जगतियानी यांनी स्वबळावर व्यवसाय उभारला. वयाच्या १७ व्या वर्षी अकाउंटिंग शिकण्यासाठी लंडनला गेला. अभ्यास आणि राहण्याचा खर्च भागवण्यासाठी तो तिथे कॅब चालवत असे. पण सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक 1973 मध्ये त्यांचे आई-वडील आणि भावाचे निधन झाले.


भावाच्या मृत्यूनंतर मिकीने त्याच्या खेळण्यांचे दुकान ताब्यात घेतले. येथून त्याचे नशीब बदलले. त्याने आपल्या भावाचे खेळण्यांचे दुकान 10 वर्षे यशस्वीपणे चालवले. आणि हळूहळू त्यांनी आणखी आऊटलेट्स उघडण्यास सुरुवात केली. तर दुबईला जाऊन त्यांनी लँडमार्क ग्रुप सुरू केला.


लँडमार्क ग्रुप ने फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि बजेट हॉटेल्स सारख्या व्यवसायात भाग घेतला. काही वर्षांत त्यांची संपत्ती 5.2 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 45 हजार कोटी रुपये झाली. लँडमार्क ग्रुपने मध्य पूर्व, आफ्रिका आणि भारतात आपला व्यवसाय वाढवला होता.


सर्व काही ठीक असताना, अचानक मिकीची यांची तब्येत बिघडू लागली. बराच वेळ ते बेडवर पडून होते. या वर्षी मे महिन्यात त्यांचे निधन झाले. तर रेणुका यांना व्यसाय चालवण्याचा अनुभव नसल्याने किंवा ना कोणी शिकवायला. मिकी यांनी रेणुकाला 1993 मध्येच कंपनीच्या बोर्डात समाविष्ट केले होते.


ते रेणुका यांना काम शिकवत राहिले, तर याचा फायदा आता झाले जेव्हा मिकी यांच्या निधनानंतर, रेणुका यांनी लँडमार्कचा ताबा घेतला आणि ती एक फायदेशीर कंपनी बनवून दाखवली. आज त्यांची गणना भारताच्या अब्जधीशांमध्ये केली जाते. रेणुका जगतियानी 39921 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील 44व्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.

VIEW ALL

Read Next Story