भारतातील अनेक मंदिरांशी संबंधित काही ना काही रहस्य आहेत. पण आगी सोबतच्या खेळाबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का?
कर्नाटकच्या मंदिरात माता दुर्गेला प्रसन्न करण्याची अनोखी पारंपारिक प्रथा आहे.
दुर्गापरमेश्वरी मंदिर कोकतील मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे लोक आगीने खेळतात.
एप्रिल महिन्यातील 8 दिवस हा खेळ चालतो. या थुथेधरा किंवा अग्नि खेला असेही म्हणतात.
हा खेळ खेळण्यासाठी लोक नारळाच्या झावळीपासून बनवलेली मशाल एकमेकांच्या अंगावर फेकतात.
असे केल्याने दुख, वेदना दूर होतात,असे म्हटले जाते.
हा खेळ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतोय.
येथे भक्त धोतर नेसून अग्नी खेळ खेळतात.