तुम्ही विमान प्रवास केला असेल तेव्हा एअर हॉस्टेस नक्कीच पाहिल्या असतील.
उड्डाणादरम्यान प्रवाशांचा आराम, सुरक्षा आणि देखभालीची जबाबदारी एअर हॉस्टेसची असते.
विमानात एअर हॉस्टेससाठी एक सिक्रेट रुम असतो, याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल.
या सिक्रेट रुमबद्दल केवळ स्टाफलाच माहिती असेल.
या सिक्रेट रुममध्ये एअर हॉस्टेस काय करतात? याबद्दल जाणून घेऊया.
सिक्रेट रुम एअर हॉस्टेससाठी खूप महत्वपूर्ण असतो.
या सिक्रेट रुममध्ये एअर हॉस्टेस आराम करतात.
अनेकदा 14-14 तास शिफ्ट करुन एअर हॉस्टेस थकतात.
आरामच नव्हे तर चेंजिर रुम म्हणूनदेखील एअर हॉस्टेस याचा वापर करतात.