डॉली चायवाल्याचा हुबेहुब डुप्लिकेट सापडला; पाहून ओळखणेही कठीण!

Published by: Intern | Jul 10, 2025

डॉली चायवाला हे आज केवळ एक नाव राहिले नाही, तर तो एक ब्रँड बनला आहे. अनेक लोक आता त्याची नक्कल करताना दिसत आहेत.

Published by: Intern | Jul 10, 2025

लखनऊमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात डॉली चायवाल्यासारखाच दिसणारा एक व्यक्ती, अगदी त्याच स्टाईलने चहा बनवताना दिसत आहे.

Published by: Intern | Jul 10, 2025

हुबेहुब डॉलीसारखा

व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने गुलाबी शर्ट, बेज रंगाची पँट, जुळणारा कमरकोट, चष्मा आणि अगदी डॉलीसारखीच केसांची स्टाईल ठेवली आहे.

Published by: Intern | Jul 10, 2025

लाखो लोकांनी पाहिला व्हिडीओ

मनोरंजक गोष्ट म्हणजे तो माणूसही अगदी डॉली चायवाल्यासारख्याच पद्धतीने चहा बनवत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे.

Published by: Intern | Jul 10, 2025

या व्हिडिओमध्ये तो माणूस म्हणतोय, 'तुम्हाला माझी स्टाईल कशी वाटली? मी लखनऊचा डॉली चायवाला आहे.'

Published by: Intern | Jul 10, 2025

नेटकऱ्यांकडून मजेशीर कमेंट्स

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मजेदार कमेंट्स करत आपली मतं व्यक्त करत आहेत. काही नेटकरी म्हणाले, 'त्याला अजून थोडं ट्रेनिंग घ्यायला हवं!'

Published by: Intern | Jul 10, 2025

इन्स्टाग्रामवर व्हायरल

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

Published by: Intern | Jul 10, 2025

VIEW ALL

Read Next Story