उद्योजक मुकेश अंबानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.
मात्र मुकेश अंबानींनी मागील अनेक वर्षांपासून कंपनीकडून पगार घेतलेला नाही.
मुकेश अंबानींची मुलं अनंत, आकाश आणि इशा यांनी आपआपल्या आवडीची क्षेत्रं निवडली आहेत. त्यानुसारच ते कंपनीसाठी काम करतात.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर असलेले अनंत, आकाश आणि इशा हे कंपन्याच्या बैठकींना उपस्थित लावल्याच्या मोबदल्यात मानधान घेतात.
अनंत, आकाश आणि इशा यांना बैठकीला उपस्थित राहिल्याचे पैसे आणि कंपनीच्या नफ्यातील पैसे दिले जाणार असं ठरवण्यात आलं आहे.
निता अंबानी यांच्यासाठी कंपनीकडून जे मानधन दिलं जायचं त्याच नियमांप्रमाणे त्यांच्या तिन्ही मुलांना म्हणजेच अनंत, आकाश आणि इशाला मानधन दिलं जातं.
इशा अंबानींकडे रिलायन्स रिटेल्सच्या विस्ताराचं ध्येय देण्यात आलं आहे. अनंत यांच्याकडे ऊर्जा आणि खनिज उद्योग देण्यात आला आहे. तर आकाश अंबानी देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीचं नेतृत्व करतात.
अनंत यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स कंपनीचं ध्येय नेट झीरो कार्बन कंपनी होण्याचं आहे. हे उद्देश गाठण्यासाठीची कालमर्यादा 2035 निश्चित केली आहे.
अनंत, आकाश आणि इशा प्रशिक्षण देण्यासाठी मुकेश अंबानी पुढील 5 वर्षांसाठी कंपनीचे निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
निता अंबानी यांना बैठकींना उपस्थित राहिल्याचे 6 लाख रुपये मिळाले होते. तसेच 2 कोटींचं कमिशन निता यांना मिळालं होतं असं कंपनीचे 2022-23 च्या आर्थिक वर्षाचे आकडे सांगतात.
निता यांच्या या मनधनावरुनच मुकेश अंबानींच्या मुलांना किती पैसे मिळतील याचा अंदाज बांधता येतो.