भर उन्हाळ्यात सुट्टीला कुठे जायचं? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. अशा सर्वच मंडळींसाठी काही खास ठिकाणांची ही खास यादी....
काही ठिकाणं इतकी अनपेक्षित की इथं येताक्षणी विसरून जाल सारंकाही...
अरुणाचल प्रददेशात असणारं हे ठिकाण वर्दळीपासून दूर असून हिमालयाची पर्वतशिखरं एका वेगळ्या नजरेतून पाहण्याची संधी इथं येऊन मिळते.
उन्हाळ्यात अनेकांचेच पाय पर्वतांकडे वळतात, पण मध्य प्रदेशातही एक असं ठिकाण आहे जे तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल. त्याचं नाव आहे पचमढी.
हिमाचल प्रदेशातील धरमशाला हे उन्हाळ्यातील सुट्टीच्या दिवसांमध्ये भेट देण्यासाठीचं एक उत्तम ठिकाण. इथं आलं असता मॅक्लोडगंजला नक्की भेट द्या.
हिमालयाच्या कुशीत दडलेलं एक सुरेख ठिकाण आणि चहाच्या मळ्यांचं नयनरम्य दृश्य दाखवणाऱ्या दार्जिलिंगलाही एकदातरी भेट द्या.
एखादं सजीव चित्र कसं असेल तर ते उटीसारखं. हे इथे येऊनच लक्षात येतं. त्यामुळं एप्रिलमधील सुट्ट्यांसाठी हे ठिकाणही एक उत्तम पर्याय.