अशोक गहलोत आणि वसुंधरा राजेंमध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?

राजस्थान विधानसभेच्या 199 जागांच्या निकालाचा कल समोर आले आहेत. येथे भाजपने आघाडी घेतली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची संपत्ती समोर आली आहे.

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी झालरापाटन येथून निवडणूक लढवली.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे यांच्याकडे 5 कोटी 5 लाख रुपयांची चल-अचल संपत्ती आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार, वसुंधरा राजेंकडे कोणती गाडी नाही.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पारंपारिक मतदारसंघ सरदारपूरा येथून निवडणूक लढवली.

प्रतिज्ञापत्रानुसार, अशोक गेहलोत यांच्याकडे 11 कोटी 68 लाख 98 हजार 758 रुपये इतकी संपत्ती आहे. यातील 10.27 कोटींची संपत्ती स्वत:कडे तर उरलेली संपत्ती पत्नीच्या नावे आहे.

वसुंधरा राजेंप्रमाणे गेहलोत यांच्याकडेदेखील कोणती गाडी नाही.

राजस्थान विधानसभा निवडणुकीचे चित्र हळुहळू स्पष्ट होऊ लागले आहे.

VIEW ALL

Read Next Story