काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेली बाईक राईड सध्या चांगलीच चर्चेत आहे. 19 ऑगस्टला राहुल गांधी यांनी स्वत: बाईक चालवत लेहपासून पँगोग झीलपर्यंत प्रवास केला होता.
राहुल गांधी यांचा लडाख दौरा चर्चेत होताच, पण त्याचबरोबर त्यांनी ज्या बाईकने प्रवास केला, ती बाईक कोणती होती याची उत्सुकताही सर्वांना आहे.
राहुल गांधी यांनी जी बाईक चालवली ती ऑस्ट्रियन टू व्हिलर निर्माात कंपनीची KTM 390 Adventure बाईक आहे. हे 20220 चं मॉडेल आहे. अॅडव्हेंचर प्रवासासाठी ही बाईक प्रसिद्ध आहे.
ही बाईक स्टँडर्ड आणि स्पोक व्हिल या दोन व्हेरिएंटमध्ये मिळते, या बाईकची किंमत 3.39 लाक रुपयांपासून 3.61 लाख रुपयांपर्यंत आहे.
या बाईकला 373 CC क्षमतेचा सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड इंजिन वापरण्यात आलं आहे. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे.
बाईकच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये कमी उंचीची सीट देण्यात आली आहे. तर टॉप व्हेरिएंटमध्ये स्पोक व्हिल आहे. ज्यात लीन-अँगलचे दोन ट्रॅक्शन कंट्रोल मोड आहेत.
या बाईकचे टायर्सवही वैशिष्टयपूर्ण आहेत. ओल्या किंवा घसरण असलेल्या रस्त्यावरही या बाईकने सहज प्रवास करता येऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे.
स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये नॉन अॅडजस्टेबल इन्व्हर्टेड फॉर्क सप्सेंशन देण्यात आले आहेत. तर टॉप व्हेरिएंटमध्ये प्री-लोड अॅडजस्टेबल सिस्टमची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे तुमच्य गरजेनुसार तुम्ही बदल करु शकता.
याबाईकचा पुढचा ब्रेक 320 मिमी आणि मागच्या बाजूला 230 मिमीचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
याशिवाय बाईकला पुढे 19 इंचाचा व्हिल तर मागे 17 इंचाचा अलॉय व्हिल देण्यात आला आहे. या बाईकची तुलना रॉयल एनफिल्ड हिमालयनशी केली जाते.