Alert : बँकेच्या चेकवर अजिबात लिहू नका 'या' गोष्टी

Sayali Patil
Jun 03,2025

व्यवहार

आर्थिक व्यवहार, पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँकेच्या चेकचा वापर केला जातो. पण, चेक भरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं.

सही

लक्षात घ्या, चेकच्या मागच्या बाजूला कोणतीही सही कधीच करू नका. कारण सही केलेल्या चेकच्या माध्यमातून कोणीही व्यक्ती पैसे काढू शकतं.

तोटा

चेक चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेल्यास आणि त्या व्यक्तीनं बँक खात्यातून पैसे काढल्यास होणाऱ्या तोट्यास बँक जबाबदार नसते.

Account Payee Only

चेकऐकजी कामय Account Payee Only चेकचाच वापर करा. या चेकवर 'अकाऊंट पेयी' किंवा Non Transferable लिहाच.

रक्कम

चेक कधीच रिकामा ठेवू नका. त्यावर रक्कम, रक्कम मिळवणारी व्यक्ती हा सर्व तपशील नक्की भरा.

तारखेचा उल्ले

गरज नसल्यास चेकच्या मागे सही करुच नका. लक्षात घ्या तारीख नसलेला चेक बँक स्वीकारत नसल्यानं तारखेचा उल्लेख नक्की करा.

वैधता

कोणताही चेक फक्त तीन महिन्यांसाठीच वैध असतो. त्यामुळं चेकनं व्यवहार करताना ही बाब लक्षात ठेवा.

VIEW ALL

Read Next Story