कुठे केलीय ही सजावट?

बंगळुरूच्या जे.पी. शहर परिसरात असलेले श्री सत्य गणपती मंदिरात ही सजावट करण्यात आली आहे.

आकर्षकरित्या सजावट

मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आकर्षकरित्या नाणी आणि नोटांची सजावट करण्यात आली आहे.

चलनी नोटांनी मंदिराची सजावट

10, 20, 50 आणि 500 च्या शेकडो चलनी नोटा आणि नाण्यांचा वापर करून मंदिराची सजावट केली आहे.

लोकांनी दान केल्या नोटा

गणपतीच्या सजावटीसाठी भाविक दररोज लाखो रुपयांच्या नोटा अर्पण करत आहेत. सणासुदीत नोटांची किंमत कळणार असल्याचे मंदिर समितीन सांगितले.

दरवर्षी नवी कल्पना

मंदिर व्यवस्थापन सणासुदीच्या काळात मंदिराची सजावट करण्यासाठी फुले, कणीस आणि कच्ची केळी यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करत आहे.

चांद्रयान मोहिमेची थीम

विक्रम लँडर, चांद्रयान-३, जय कर्नाटक, जय जवान जय किसान, मेरा भारत महान ही थीम यावेळी मंडळाने देखाव्यासाठी तयार केली आहे जी सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज होत आहेत.

महिन्याभरापासून सुरु आहे काम

मंदिराच्या एका ट्रस्टीने सांगितले की, सुमारे 150 लोकांच्या टीमने महिनाभरात नाणी आणि नोटांच्या हारांनी मंदिर सजवले आहे.

सुरक्षेसाठी मोठी व्यवस्था

मंदिर प्रशासनाने या देखाव्यासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही पाळत ठेवली जात आहे.

अडीच कोटींचा देखावा

10,20,50,100,200 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांसह मंदिरात नाण्यांचीही सजावट करण्यात आली आहे. याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story