भारतात, महाराष्ट्रात पर्यटनाची अनेक ठिकाणं असून, वसईहून महाराष्ट्राची सीमा ओलांडताच गुजरातमध्ये प्रवेश केला तर तिथंही एक कमाल ठिकाण आहे.
हे ठिकाण खवैय्यांपासून खरेदी प्रेमींसाठी उत्तम जागा असून इथं काही निवांत क्षणही व्यतीत करता येतात.
या ठिकाणाचं, या शहराचं नाव आहे सूरत. सूरतमधील किल्ला, डुमस समुद्रकिनारा ही भटकंतीसाठीची एकाहून एक सरस ठिकाणं.
विज्ञानाची आवड असणाऱ्यांसाठी सूरतच्या सायन्स सेंटरला आवर्जून भेट द्यावी.
सूरतमध्येच असणारं सरथाना नेचर पार्क आणि प्राणीसंग्रहालय वन्यजीवप्रेमींच्या आवडीचं ठिकाण.
काही निवांत क्षणांसाठी सूरतच्या गोपी तलाव आणि नजीकच्या परिसरालाही नक्की भेट द्या.
काय मग, सूरतच्या या भटकंतीच्या वाटांचे वाटसरु कधी होताय?