राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकांमधील 3 राज्यात भाजपाने सत्ता मिळवली आहे.
रविवारी, 3 डिसेंबर 2023 रोजी लागलेल्या निकालांमुळे भाजपाकडे आणखी 2 राज्यं आली आहेत. भाजपा नेमक्या किती राज्यांमध्ये सत्तेत आहे पाहूयात.
भाजपाची सत्ता उत्तराखंड, हरयाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरूणाचल प्रदेशमध्ये आहे.
रविवारी भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही सत्ता मिळवली.
याशिवाय महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत भाजपा आघाडी सरकार आहे.
कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तर, तेलंगणात काँग्रेसने रविवारी सत्ता मिळवली.
आता देशातील 12 राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजपा हा सर्वाधिक राज्यांत सत्ता असलेला पक्ष ठरलाय.
3 राज्यांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर तर दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्तेत असणारा आम आदमी पक्ष (आप) तिसऱ्या क्रमाकांवर आहे.
बिहार आणि झारखंडमध्ये काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आहेत.
तामिळनाडूत काँग्रेस डीएमकेचा मित्रपक्ष आहे. पण, काँग्रेस सरकारचा भाग नाही.