2 तरुणांनी सुरु केलं blinkit, 'अशी' बनली 1 लाख कोटींची कंपनी!

Pravin Dabholkar
Sep 15,2024


ब्लिंकीटद्वारे 10 ते 15 मिनिटांत वस्तू तुमच्या घरी पोहोचतात.


आज प्रत्येकाच्या तोंडी याचे नाव आहे. पण याची सुरुवात कोणी केली? माहिती आहे का?


पंजाबमध्ये राहणारा अलबिंदर ढिंढसा आणि आयआयटी मुंबईतून शिकलेला सौरभ कुमार हे 2010 मध्ये अमेरिकेतील लॉजिस्टिक कंपनीत काम करायचे. येथे दोघांमध्ये चर्चा झाली.


दोघेही आपल्या कामाबद्दल खुश नव्हते. भारतात येऊन काहीतरी व्यवसाय सुरु करावा असे त्यांना वाटले. 2013 ला चे मायदेशी परतले.


तांदूळ, पीठ, दूध, दही घरोघरी पोहोचवण्यासाठी काही प्लॅटफॉर्म नाहीय, हे त्यांच्या लक्षात आले.


यासाठी त्यांनी ग्रोफर्सची सुरुवात केली, जे पुढे जाऊन ब्लिंकीट बनले. 2022 मध्ये झोमॅटोने ब्लिंकींट खरेदी केले.


पहिल्या वर्षी कंपनीला 2.8 लाखांचे नुकसान झाले. पुढच्या वर्षी 2014-15 ला 4 कोटींचं नुकसान झालं. नुकसान भरुन काढण्यासाठी कंपनीने फंड गोळा केले.


2023-24 मध्ये ब्लिंकीटचा वार्षिक रेवेन्यू 769 कोटी होता. कंपनीचे वॅल्यूएशन 13 बिलियन डॉलर म्हणजे 1 लाख कोटी इतके आहे.

VIEW ALL

Read Next Story