Budget 2024 : बहीखाता अर्थात बजेट ब्रीफकेसचा रंग लाल का असतो?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 29,2024

बजेट 2024

Budget 2024 : बहीखाता अर्थात बजेट ब्रीफकेसचा रंग लाल का असतो?1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सहाव्यांदा बजेट सादर करणार आहे. यावर्षी बजेटच्या माध्यमातून अर्थमंत्री Financial Year चा लेखा-जोखा सादर करतील.

बजेट ब्रीफकेस लाल रंगाची का असते?

बजेटची कागदपत्रे ठेवण्यासाठी वापरली जाणारी बॅग दरवर्षी बदलली जाते. आता या बॅगेचे रुपांतर आता बहीखात्यात झालं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, याचा रंग कायमच लाल का असतो?

पहिल्यांदा बजट ब्रीफकेसचा रंग लाल

1860 मध्ये पहिल्यांदा बजेट ब्रीफकेसचा रंग लाल वापरण्यात आला होता. ही ब्रीफकेस ब्रिटीश चान्सलर ग्लॅडस्टनने बजेटची कागदपत्रे ठेवण्यासाठी बनवलं होतं.

ग्लॅडस्टन बॉक्स

त्यांनी मुलीच्या बॅगेवर लाल रंगाचे चामडे लावले होते. आणि त्यावर ब्रिटिश राणीचा मोनोग्राम छापून घेतला होता. तेव्हा या बजेट ब्रीफकेसला ग्लॅडस्टन बॉक्स असे म्हटले जायचे.

रंग लाल का

यानंतर कधीही बजेट ब्रीफकेस सादर केली गेली. तेव्हा त्याचा रंग लाला होता. लाल रंगामुळे सगळ्यांच लक्ष आकर्षित केले जाऊ शकते.

ब्रीफकेससोबत नव-नवे प्रयोग

काळानुसार, या ब्रीफकेसमध्ये नव-नवे प्रयोग केले गेले. 1958 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल रंगाऐवजी काळ्या रंगाच्या ब्रीफकेसचा वापर केला.

काळ्या रंगाची ब्रीफकेस

1991 मध्ये मनमोहन सिंह यांनी ब्रीफकेस लाल रंगाची घेतली. 1998-99मध्ये यशवंत सिंह यांनी लाल ब्रिफकेसवर काळ्या रंगाचे बक्कल आणि पट्टे लावले. ब्रीफकेसमध्ये काही कॉमन राहिलं तर ते लेदर.

लाल रंगाची ब्रीफकेस

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात निर्मला सीतारमण अर्थमंत्री झाल्या तेव्हा त्यांनी ब्रीफकेस आणि बॅगेची परंपरा तो़डून लाल रंगाच्या बहीखात्याचा वापर केला.

VIEW ALL

Read Next Story