रतन टाटा यांनी सांगितलेले यशाचे 'हे' मंत्र कायम लक्षात ठेवा
'लोखंडाचा नाश फक्त त्यावरील गंजच करू शकतो. अगदी तसंच एखाद्या व्यक्तीचा नाश कोणीच नव्हे, तर त्याची विसारसरणी करु शकते'
'तुम्हाला वेगानं पुढे जायचंय तर, एकटे चाला. तुम्हाला फार पुढपर्यंत जायचं असेल तर मात्र सर्वांच्या सोबतीनं पुढे चाला.'
'योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही, मी आधी निर्णय घेतो आणि नंतर ते योग्य ठरवतो.'
'फार गंभीर होऊ नका, आयुष्य समोर येईल तसं जगा.'
'संकटांशी अशा रितीनं दोन हात करा की कायम तुम्ही ताठ मानेनं जगाल आणि रात्रीची शांत झोप घेऊ शकाल.'
'जीवनातील चढ-उतार कायमच महत्त्वाचे आहेत. कारण, एक सरळ रेष ECG मध्ये दिसल्यास आपण हयातच नाही, असं ठरवून जाते.'
'अनेकांना असंच वाटतं की, आपण वाचलेली प्रत्येक गोष्ट कायमच खरी असते.'