भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, ट्रेनमध्ये दारूसोबत प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे. इतकंच नव्हे तर तुम्ही जर दारु किंवा नशेच्या कोणत्याही अन्य वस्तूसोबत प्रवास केल्यास तुम्हाला कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल.

जर तुम्ही रेल्वे प्रवासात दारु व कोणतीही नशा करणारी वस्तू घेऊन जाताना सापडलात तर तुमच्यावर भारतीय रेल्वे अधिनियम 1989 द्वारा 165 प्रमाणे तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

रेल्वे परिसरात व रेल्वेत कोणतीही व्यक्ती नशा होणाऱ्या वस्तूंचा वापर करत असेल किंवा नशेच्या अवस्थेत आढळल्यास तसेच त्याची वर्तणूक इतर प्रवाशांसाठी जोखीमीची झाल्यास त्या व्यक्तीचे ताबडतोब तिकिट रद्द केले जाते.

अशा व्यक्तीस कायद्यानुसार सहा महिने तुरुंगवास होण्याची शक्यता असते तर 500 रुपये दंड देखील द्यावा लागतो.

मद्याव्यतिरिक्त तुम्ही रेल्वेत प्रवास करताना कोणतंही केमिकल, गॅस, सिलेंडर, फटाके, ग्रीस, किंवा दुर्गंधित वस्तू घेऊन प्रवास करु शकत नाही.

या वस्तूंसोबत जर तुम्ही प्रवास करताना सापडलात तर रेल्वे तुमच्यावर कारवाई करु शकते व तुम्हाला 1000 रुपयांचा दंड देऊन सोबतच 3 वर्षाचा तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.

या वस्तूसोबत प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास व कोणत्याही प्रकारची दुर्घटना उद्भवली तर त्याची जबावदारी देखील त्या दोषी व्यक्तीला घ्यावी लागते.

VIEW ALL

Read Next Story