दर महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी बदलण्याची शक्यता आहेत. या गोष्टी कोणत्या पाहूयात...
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या कमर्शियल आणि गॅस सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेतात.
1 ऑगस्टपासून एलपीजी सिलेंडर्सच्या दरामध्ये बदल होऊ शकतात. तसेच पीएनजी, सीएनजीच्या दरातही बदल होऊ शकतात.
ऑगस्ट महिन्यामध्ये वेगवेगळ्या झोन्सअंतर्गत 14 दिवस बँका बंद राहतील.
दुसरा शनिवार, रविवार, स्वातंत्रदिन, रक्षाबंधनाच्या सुट्ट्या यंदाच्या महिन्यात आहेत. या सुट्ट्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या तारखांमध्ये असतील.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत कलश योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट आहे. ही एसबीआयची स्पेशल एफडी योजना आहे.
400 दिवसांच्या या योजनेमध्ये सामान्य नागरिकांना एसबीआयकडून 7.1 टक्के व्याज मिळेल. वरिष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याज मिळेल.
आयडीएफसी बँकेने अमृत मोहत्सव एफडी ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु केली आहे.
आयडीएफसीच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेवटची तारीख 15 ऑगस्ट आहे. यात गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे केवळ 15 दिवस शिल्लक आहेत.