JEE अ‍ॅडव्हान्समध्ये होती AIR 29 रँक, परदेशातील करोडोचं पॅकेज सोडून धैर्या करतेय 'हे' काम!

Pravin Dabholkar
Apr 20,2025


इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर JEE ही भारतातील कठीण परीक्षा द्यावी लागते.


लाखो उमेदवार आयआयटीमधून शिकून मग परदेशात कोट्यवधींचे पॅकेज घेतात. पण धैर्या संध्यानाने हे जाणिवपूर्वक सोडलं.


धैर्याने 2014 मध्ये जेईई अॅडव्हान्समध्ये ऑल इंडिया 29 रॅक मिळवला होता.


दहावीपासून जेईईचा अभ्यास करायला घेतल्याचे धैर्या सांगते.


आधी जेईई मेन्स आणि नंतर जेईई अॅडव्हान्स क्रॅक केली. यानंतर तिने आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला.


येथून तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.


यानंतर ती दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी कंपनी सॅमसंगमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर बनली. तिथे तिला कोट्यवधीचे पॅकेज मिळाले. पण ती नोकरी धैर्याने सोडली.


धैर्या आता जेईईच्या उमेदवारांना शिकवते. त्यांच्यामध्ये ती प्रसिद्ध आहे.


इंन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवरुन ती जेईईची तयारी करुन घेते.


तिचे इन्स्टाग्रामवर 100k फॉलोअर्स आणि युट्यूबवर 62.9k सबस्क्रायबर्स आहेत.


शिकवण्यानं मला आनंद मिळतो, त्यामुळे मी क्षेत्र निवडल्याचे धैर्याने आपल्या मुलाखतीत सांगितले होते.

VIEW ALL

Read Next Story