भारताला नद्यांचा देश असं म्हणतात.
भारतात लहान-मोठ्या अशा एकूण 200 नद्या वाहतात.
देशातल्या प्रत्येक राज्यात आपल्याला कोणती ना कोणती नदी आढळून येईलच.
मात्र भारतातली सर्वात खोल नदी कोणती आहे तुम्हाला ठाऊक आहे का?
तुम्ही गंगा किंवा यमुना, गोदावरी असा विचार करत असाल तर चुकत आहात.
भारतातील सर्वात खोल नदी ब्रम्हपुत्रा असल्याचं मानलं जातं.
ब्रम्हपुत्रा नदी तिबेट, भारत आणि तिथून पुढे बांगलादेशातून पश्चिम बंगालच्या महासागराला जाऊन मिळते.
असं म्हणतात की ब्रम्हपुत्रा नदी एवढी खोल आहे की तिच्यात 72 मीटर उंचीचं कुतुब मीनारही पूर्णपणे बुडून जाईल.
ब्रम्हपुत्रा नदीचा सर्वात खोल भाग हा 380 फूट म्हणजेच 115.8 मीटर एवढा आहे.
ब्रम्हपुत्रा ही देशातील एकमेव पुरुष नदी म्हणूनही ओळखली जाते.