या गोष्टी लॉकरमध्ये ठेवल्यास होऊ शकते कायदेशीर कारवाई; लॉकर सुविधाही होईल बंद, जाणून घ्या नियम

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

उत्तम सुविधा

महत्त्वाची कागदपत्रं आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेचे लॉकर ही उत्तम सुविधा आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

लॉकरची सुविधा

बँकेमध्ये बचत खातं अथवा करंट खातं असेल त्याच ग्राहकांना लॉकरची सुविधा पुरवली जाते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

कागदोपत्री पुरावे

बँकेतील लॉकर सुविधा सुरु करुन घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्डच्या फोटोकॉपीबरोबरच राहत्या घराचा पत्त्याचा कागदोपत्री पुराव्याची प्रत बँकेकडे जमा करावी लागते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

या गोष्टी ठेवणाऱ्यांची संख्या जास्त

बँकेच्या लॉकरमध्ये दागिने, मौल्यवान रत्न, कागदपत्रं ठेवणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

कॅश ठेवण्यास बंदी

मात्र लॉकरसंदर्भातील नियमांनुसार, बँकेच्या लॉकरमध्ये कॅश म्हणजेच चलनी नोटा ठेवता येत नाहीत. असं केलं तर लॉकरधारकाविरोधात कारवाई करण्याचे अधिकार बँकेला असतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

या तीन गोष्टी ठेवणं कायद्याने गुन्हा

कोणत्याही बँकेच्या लॉकरमध्ये हत्यार, विस्फोटक पदार्थ किंवा अंमली पदार्थ ठेवणं कायद्याने गुन्हा आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

बँक दंड करु शकते

एखादी खराब होणारी, नाशवंत वस्तू लॉकरमध्ये ठेवणं सुद्धा कायद्याने चुकीचं आहे. असं करणाऱ्यालाही बँक दंड करु शकते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

या वस्तू ठेवल्या तरी गुन्हा

एखादी किरणोत्सर्जन करणारी किंवा कायद्याने बाळगण्यास बंदी असलेली वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणं हा गुन्हा मानला जातो.

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

लॉकरमध्ये ठेवण्यास प्रतिबंध

बँकेला किंवा लॉकर सुविधा वापरणाऱ्या इतर ग्राहकांना त्रास होईल अशी कोणतीही वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास प्रतिबंध असतो.

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

...तर लॉकर सुविधा रद्द

यापैकी एखादी जरी वस्तू तुमच्या बँकेच्या लॉकरमध्ये असेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो तसेच गांभीर्य लक्षात घेत तुमची लॉकर सुविधाही रद्द केली जाऊ शकते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 21, 2025

VIEW ALL

Read Next Story