तुमच्या कपाटतलं सोनं खरं आहे की खोटं? कसं ओळखाल? जाणून घ्या 5 सोप्या घरगुती ट्रिक्स

Swapnil Ghangale
Apr 22,2025

तुमच्या घरातलं सोनं खरं की खोटं...

तुमच्या घरात असलेलं सोनं खरं आहे की खोटं हे तुम्हाला घरच्या घरी ओळखता येईल. कसं ते जाणून घेऊयात...

बीआयएस हॉलमार्क

सोन्यावर बीआयएस हॉलमार्क असतो. हा हॉलमार्क त्रिकोणी लोगोसारखा असतो.

22 कॅरेट सोनं वापरणं अधिक योग्य

सोन्याच्या दागिन्यांसाठी सामान्यपणे 22 कॅरेट सोनं वापरणं अधिक योग्य मानलं जातं.

सत्यता पडताळून पहायची असेल तर...

घरच्या घरी सोन्याच्या दागिन्यांची सत्यता पडताळून पहायची असेल तर त्या दागिन्यांवर व्हिनेगरचे दोन थेंब टाका.

व्हिनेगरचे थेंब टाकल्यानंतर...

व्हिनेगरचे थेंब टाकल्यानंतर दागिन्यांचा रंग काळा पडला तर ते दागिने खऱ्या सोन्यापासून बनवलेले नाहीत असं समजावं. खऱ्या सोन्याच्या दागिन्यांचा रंग व्हिनेगरने बदलत नाही.

सोन्याचे दागिने पाण्यात टाकले तर...

खऱ्या सोन्याचे दागिने पाण्यात टाकले तर ते पाण्यात बुडतात. नकली सोन्याचं असं होतेच असं नाही.

लोहचुंबकाच्या सहाय्याने...

लोहचुंबकाच्या सहाय्यानेही सोन्याची सत्यता पडताळून पाहता येते. खरं सोनं लोहचुंबकाकडे खेचलं जात नाही.

दाताने दाबल्यानंतर...

खरं 24 कॅरेट सोनं हे तुलनेनं नरम असतं, कारण ते अधिक शुद्ध असतं. दाताने दाबल्यानंतरही अशा सोन्याच्या दागिन्यांवर निशाण उमटते.

सोन्याचा आवाज

खरं सोनं हे थोडसं पिवळ्या रंगाचं असतं. या सोन्याचा आवाज सामान्य धातूसारखा येत नाही. खऱ्या सोन्याचा आवाज वेगळा असतो.

VIEW ALL

Read Next Story