Sundar Pichai यांच्याकडे कोणतं नागरिकत्व? भारत की अमेरिका? या प्रश्नाचं उत्तर पाहून बसेल धक्का

Swapnil Ghangale
Jul 16,2025

जुन्या मित्राला भेटले

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये त्यांच्या एका जुन्या मित्राला भेटले.

पिचाई यांचा मित्र

सुंदर पिचाई यांचा हा मित्र सध्या इस्कॉनचा भिक्षु गौरंगा दास म्हणून ओळखला जातो. हे दोघेही आयआयटी खरगपुरमध्ये एकाच बॅचला होते.

पिचाई मस्करीत म्हणाले होते

गौरंगा दास माझ्यापेक्षा अधिक तरुण वाटतात, असं सुंदर पिचाई मस्करीत म्हणाले. त्यावर गौरंगा यांनी मी देवाशी जोडला गेलेलो आहे आणि तुम्ही तणावाशी जोडलेले आहात, असं उत्तर दिलं.

शिक्षण कुठे घेतलं?

त्यानंतर सुंदर पिचाई अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि पेनसिल्वेनियामधील व्हॉर्टन स्कूल येऊन उच्च शिक्षण घेतलं.

खरंच कोणतं नागरिकत्व आहे?

सुंदर पिचाई यांचा अनेकदा भारतीय वंशाचे नागरिक म्हणून उल्लेख केला जातो. मात्र त्यांच्याकडे खरंच कोणतं नागरिकत्व आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

पिचाई यांच्याकडे कोणतं नागरिकत्व?

तर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, सुंदर पिचाई यांच्याकडे अमेरिकी नागरिकत्व आहे. ते कागदोपत्री भारताचे नागरिक नाहीत.

त्या क्षणी भारताचं नागरिकत्व संपतं

भारतात दुहेरी नागरिकत्वाला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळेच ज्या क्षणी एखादी व्यक्ती दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारते त्या क्षणी तिचं भारताचं नागरिकत्व संपतं.

ओसीआय कार्ड दिलं जातं

सुंदर पिचाईसारख्या लोकांसाठी भारत सरकार ओसीआय कार्ड देते. म्हणजेच ओव्हर सीज इंडियन असा या कार्डचा फुलफॉर्म असून हे कार्ड असलेल्यांना भारतात प्रवास करताना काही विशेष सवलती दिल्या जातात.

त्या लोकांना भारतात परवानगी नसते

ओसीआय कार्डधारांना भारतात राहण्याची, संपत्ती विकत घेण्याची आणि काम करण्याची परवानगी असते. मात्र त्यांना मतदान करण्याची आणि सरकारी नोकरीची परवानगी दिली जात नाही.

भारत माझ्या नसानसांमध्ये...

एका मुलाखतीमध्ये सुंदर पिचाई यांनी, 'भारत माझ्या नसानसांमध्ये आहे. माझं बालपण हे कोणत्याही सर्वसाधारण भारतीय मुलाप्रमाणे गेलं ज्यामध्ये मी सुद्धा सुविधांची कमकतरता अनुभवली आहे,' असं म्हटलं होतं.

VIEW ALL

Read Next Story