देशातील प्रत्येक राज्यामध्ये अनेक जिल्हे असून हे जिल्हे क्षेत्रफळाच्या स्वरुपात लहान- मोठे असतात.
तुम्हाला भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता माहितीये? दक्षिण भारतात असणाऱ्या या ठिकाणाचं नाव लक्षात येतंय का?
भारतातील सर्वात लहान जिल्हा पुद्दुचेरीमध्ये असून, त्याचं नाव आहे 'माहे'. अवघ्या 9 चौरस किमी इतक्या भागामध्ये हा जिल्हा वसला आहे.
या जिल्ह्याच्या एका बाजूला केरळ आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. देशातील 4000 शहरांपैकी हे सर्वात लहान शहर आहे.
माहेची आणखी एक ओळख म्हणसे फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव असणारं ठिकाण. इथं मल्याळम आणि फ्रेंच भाषा प्रचलित आहे.
माहेमध्ये कायमच शांत वातावरण पाहायला मिळतं. इथं निसर्गाचं रुप मन मोहणारं असतं. शिक्षण आणि व्यवसायाच्या दृष्टीकोनातूनही माहे एक विकसनशील आणि प्रगतीपथावर असणारं ठिकाण म्हणून नावारुपास येत आहे.