भारतातील सर्वात रहस्यमय नदी! या नदीच्या पाण्याला स्पर्श करायलाही घाबरतात लोक; कारण...

Swapnil Ghangale
Apr 27,2025

14 मोठ्या प्रमुख नद्या

भारतात 400 हून अधिक नद्या वाहतात. यामध्ये 14 मोठ्या प्रमुख नद्यांचाही समावेश आहे.

प्रमुख नद्या कोणत्या?

भारतात गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, ब्रम्हपुत्रा यासारख्या प्रमुख नद्यांचा समावेश होतो.

पाण्याला स्पर्श करायलाही लोक घाबरतात

मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या देशात एक अशी नदी आहे जिच्या पाण्याला स्पर्श करायलाही लोक घाबरतात.

या नदीचं नाव काय?

ज्या नदीबद्दल आपण बोलत आहोत तिचं नाव आहे कर्मनाशा नदी. ही नदी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमेवरुन वाहते.

कुठून वाहते ही नदी?

बिहारमधील कैमूर जिल्ह्यात कर्मनाशा नदी उगम पावते आणि पुढे उत्तर प्रदेशमधील सोनभद्र, चंदौली, वाराणसी आणि गाजीपुर जिल्ह्यांमधून वाहत जाऊन बक्सरजवळ गंगेत मिसळते.

192 किलोमीटर लांबीच्या...

192 किलोमीटर लांबीच्या कर्मनाशा नदीबद्दल एक पुराणकथा प्रचंड प्रचलित आहे. त्यामुळेच या नदीच्या पाण्याला स्पर्श करण्यासही लोक घाबरतात.

अशी मान्यता आहे की ही नदी...

त्रिशंकु राजाच्या दंतकथेनुसार ही नदी राज्याच्या लाळेपासून निर्माण झाली असून त्यामुळेच ही नदी शापित मानली जाते.

यावरुनच मिळालं नाव

पुराणकथेनुसार कर्मनाशा नदीच्या पाण्याला स्पर्श केल्यास पाण्याला स्पर्श केलेल्या व्यक्तीने केलेलं सर्व पुण्य नष्ट होतं. यावरुनच नदीला कर्मनाशा हे नाव मिळालं आहे.

सामान्य माहितीवर आधारित

Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती मान्यता आणि सामान्य माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.

VIEW ALL

Read Next Story