तुम्ही राजधानी दिल्लीमधील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लाल किल्ल्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या किंवा वाचल्या असतील.
लाल रंगाचा खडक वापरुन मुघलांनी उभारलेला हा किल्ला आजही त्याच्या स्थापत्य रचनेसाठी आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो.
किल्ल्यात अनेक महल, कमानी आणि बागीचे आहेत जे मुघल स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखली जातात.
लाल किल्ल्याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत युनिस्कोकडून स्थान मिळालेलं आहे.
शहाजहाँने 1638 मध्ये या किल्ल्याचं बांधकाम सुरु केलं होतं. या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला 'लाहोर दरवाजा' नावानं संबोधलं जातं.
प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहणानंतर याच किल्ल्यावर देशाला संबोधित करतात.
तुम्ही लहानपणापासूनच या किल्ल्याला 'लाल किल्ला' नावानेच ओळखत आला असाल किंवा याच नावाने तुम्ही बातम्यांमध्येही किल्ल्यावरील ध्वजारोहणाबद्दल वाचलं असेल किंवा टीव्हीवर पाहिलं असेल.
मात्र मुघलांनी हा किल्ला बांधला तेव्हा त्याचं नाव वेगळं ठेवलं होतं. याबद्दल देशातील 99 टक्के लोकांना कल्पनाच नाही की या किल्ल्याचं मूळ नाव काय आहे.
तर मुघलांनी आज जी वास्तू लाल किल्ला नावाने ओळखली जाते ती बांधली तेव्हा तिचं नाव 'किला-ए-मुबारक' असं ठेवलं होतं.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून देण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)