पाकिस्तान 'या' 10 गोष्टींमध्ये जगात नंबर 1! भारतच काय कोणत्याच देशाकडे नाही यातली एकही गोष्ट

Swapnil Ghangale
Apr 21,2025

या दहा गोष्टींमध्ये पाकिस्तान नंबर वन

जगातील दहा सर्वोत्तम गोष्टींमध्ये पाकिस्तान एक नंबरचं राष्ट्र आहे असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हे खरं आहे. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात..

सर्वात उंच शिखर

पाकिस्तानमध्ये जगातील सर्वात उंच शिखरांपैकी काही शिखरं आहेत. यापैकी के-2 हे सर्वात उंच शिखर पाकिस्तानातच आहे. हिंदकुश, काराकोरम, हिमालयासारख्या पर्वतरांगा पाकिस्तानात आहेत.

जगातील सर्वात मोठं बंदर

जगातील सर्वात मोठं बंदर हे पाकिस्तानमध्ये आहेत. या बंदराचं नाव ग्वादर असं असून पाकिस्तानबरोबरच चीन सुद्धा या बंदराचा वापर करतं.

जगातील सर्वात उंचावरील पक्का रस्ता

चीन-पाकिस्तानदरम्यानचा मैत्री राजमार्ग हा जगातील सर्वात उंचावरील पक्का रस्ता आहे.

या नावानेही मार्ग प्रसिद्ध

चीन-पाकिस्तान मैत्री मार्गाला काराकोरम राजमार्ग असंही म्हणतात.

सर्वात उंचावरील पोलो मैदान

पाकिस्तानमधील शंदूर येथील पोलोचं मैदान हे जगातील सर्वात उंचावरील पोलो मैदान आहे.

सर्वात मोठी सेवाभावी संस्था जी...

पाकिस्तानमधील ईधी फाऊंडेशन जगातील सर्वात मोठी अशी सेवाभावी संस्था आहे जी रुग्णांना मोफत रुग्णवाहिका पुरवते.

फुटबॉल निर्मितीचं केंद्र

जगात विकल्या जाणाऱ्या एकूण फुटबॉल संख्येच्या अर्ध्याहून अधिक फुटबॉल हे पाकिस्तानमधील सियालकोट येथे तयार होतात.

जगात पहिल्या क्रमांकाचा देश

पाकिस्तान हाताने शिवकेलेल्या फुटबॉलच्या उत्पन्नामध्ये जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे. मागील दोन्ही फिफा वर्ल्डकपमधील सर्वाधिक फुटबॉल हे पाकिस्तामध्येच तयार करण्यात आलेले.

जगातील सर्वात मोठा बंधारा जो...

पाकिस्तानमधील तारबेला बंधारा हा मातीने तयार करण्यात आलेला जगातील सर्वात मोठा बंधारा आहे. स्ट्रक्चरल व्हॅक्युमचा विचार केल्यास हा जगातील सर्वात मोठा मातीने बांधलेला बंधारा आहे.

असा एकमेव मुस्लिम देश ज्याच्याकडे...

पाकिस्तान हा जगातील असा एकमेव मुस्लिम देश आहे ज्यांच्याकडे स्वत:ची अण्वस्र म्हणजेच न्यूक्लिअर वेपन्स आहेत.

मलाला यूसुफजई

सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार मिळवणारी मलाला यूसुफजई ही मूळची पाकिस्तानी आहे.

सर्वात पुरातन संस्कृती

जगातील सर्वात पुरातन आणि सर्वात मोठ्या मानवी संस्कृतींपैकी एक म्हणजे सिंधू खोऱ्यातील संस्कृतीचा विकास ज्या भागात झाला तो भाग आज पाकिस्तानमध्ये आहे.

VIEW ALL

Read Next Story