EPFO च्या वतीनं नोकरी करणाऱ्या मंडळींच्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीएफ खात्याची देखभाल ठेवली जाते.
या पीएफ खात्यात दर महिन्याला पगारातूनच काही रक्कम जमा होते.
वैद्यकिय खर्च कारणासाठी व्यक्तीला 6 महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम पीएफ खात्यातून काढता येते.
गृहकर्ज फेडण्यासाठीसुद्धा 90 दिवसांच्या पीएफची रक्कम काढता येते.
पीएफ खातं सुरू झाल्यानंतर काही वर्षांत लग्न किंवा तत्सम खर्चांसाठी ही रक्कम काढता येते.
वरील सुविधेअंतर्गत खातेधारकांना पीएफ खात्यातून एकदाच पैसे काढण्याची मुभा मिळते.
पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी मोबाईल अॅप, अधिकृत संकेतस्थळ अशी व्यवस्थाही करुन देण्यात आली आहे.