गंगा नदीला भारतात मातेचं स्वरुप मानतात. या नदीची गंगा माता म्हणूनच पूजा केली जाते.
मात्र गंगा नदीची बहीण कोणत्या नदीला म्हणतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? अर्ध्याहून अधिक भारताला याची कल्पनाच नाही.
गंगा नदीची बहीण कोणत्या नदीला म्हणतात? असं विचारलं की सामान्यपणे लोक यमुना किंवा सरस्वती नदीचं नाव घेतात. मात्र ही दोन्ही उत्तरं चुकीची आहेत.
गंगा नदीची बहीण ज्या नदीला म्हटलं जातं तिचं नाव देविका नदी आहे.
पौराणिक मान्यतांनुसार देविका नदीला गंगा नदीची थोरली बहीण मानलं जातं.
देविका नदीचा उगम जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये असलेल्या सुध महादेव मंदिराजवळ होतो.
जम्मू-काश्मीरमध्ये उगम पावलेली देविका नदी पुढे पाकिस्तानमध्ये प्रवेश करुन रावी नदीला मिळते.
अनेक धार्मिक मान्यतांमुळे देविका नदीला देवकनगरी नावानेही ओळखलं जातं.
एका उगमस्थळावरुन सुरुवात होऊन देविका नदी अनेक ठिकाणी प्रकट होते अशी मान्यता आहे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (सर्व फोटो - प्रातिनिधिक आहे.)