राजा-महाराजा म्हातारपणात ताकदीसाठी काय खायचे? दमदार बॉडीचे सिक्रेट!

Pravin Dabholkar
Jun 03,2025


त्या काळी जिम नव्हती, सप्लीमेंट नव्हती तरी राजा महाराजा फिट असायचे. त्यांच्या खाण्यामध्येच तब्येतीचं रहस्य लपलंय.


पहाटे पहाटे ताजे लोणी खाणं हे नित्याचं होतं. यामुळे शरीराला ताकद मिळायची आणि बॉडी अॅक्टीव्ह राहायची.


त्यांच्या खाण्यात देशी तूप असायचेच. भाजी, भाकरी सर्वकाही तुपातूनच बनायचे. यामुळे शरीर आतून मजबूत बनायचे.


बदाम, अक्रोड, अंजीर सारखे सुका मेवा ते रोज खायचे. यामुळे बुद्धी तेजस्वी राहायची.


अश्वगंधा हे त्यांच्या ताकदीचे सिक्रेट होते. यामुळे शरिरात जोश आणि स्टॅमिना राहायचा.


रात्री गरम दुधात थोड मध टाकून प्यायचे. यामुळे झोप चांगली यायची आणि आतून ताकदही मिळायची.


साधं सोपं देशी जेवणं त्यांना ताकदवान बनवायचं. ज्यामुळे ते तासनतास घोड्यावर लढाई करु शकायचे.


वयाप्रमाणे ताकद कमी होऊ नये असे तुम्हालाही वाटत असेल तर देशी पदार्थ खाण्यावर भर द्या. राजा-महाराजा हेच करायचे.


(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story