Health Insurance आणि Mediclaim मध्ये नेमका फरक काय?
Health Insurance vs Mediclaim : बऱ्याचदा असं होतं की, अनेकांना मेडिक्लेम पॉलिसी आणि हेल्थ इंश्योरन्स एकसारखेच वाटतात. पण, खरा पेच तेव्हा निर्माण होतो ज्यावेळी तुम्ही सर्व खर्चाची बिलं एकत्र करून त्यासाठीची रक्कम क्लेम करण्याचा निर्णय घेता.
बऱ्याचदा रक्कम क्लेम करण्यासाठी पोहोचलं असता लक्षात येतं की, अमुक एका व्यक्तीनं मेडिक्लेम खरेदी केला होता आणि त्यांना फक्त रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच खर्चाची रक्कम परत मिळणार आहे.
थोडक्यात हेल्थ इंश्योरंस असो किंवा मेडिक्लेम तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मेडिक्लेम ही एक अशी पॉलिसी आहे जिथं तुम्हाला कोणत्याही हेल्थ इमरजन्सीमध्ये खर्चाचा परतावा मिळतो.
मेडिक्लेममध्ये पेशंट कव्हर, डे केअर उपचार, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च समाविष्ट असतो. तुमच्याकडे मेडिक्लेम असल्याच विमा कंपनीकडे खर्चाची बिलं जमा करावी लागतील. तुम्ही हा मेडिक्लेम कॅशलेसही ठेवू शकता.
हेल्थ इंश्योरंस मध्ये मेडिकल आणि सर्जिकल असे दोन्ही उपचार सहभागी असतात. तुम्ही इथं कॅशलेस उपचारांचा पर्यायही निवडू शकता. यामध्ये आजारपणादरम्यान रुग्णालयात दाखल होण्यापासून औषधोपचारांपर्यंतचा खरंच तुम्हाला करावा लागत नाही.
हेल्थ इंश्योरंस पॉलिसीनुसार हा खर्च कंपनीनं उचलणं अपेक्षित असतो. थोडक्यात कंपनीकडून दिलेली ही एक प्रकारची हमी असते. त्यामुळं पॉलिसीधारक निर्धास्त असतात.