दिवाळीच्या फराळ बनवायला सुरुवात झाली आहे. यात करंजी, लाडूसोबत चकली हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो.

Pravin Dabholkar
Nov 03,2023


आपण घरी तशी चकली बनवायचा प्रयत्न करतो पण होत नाही.


यासाठी आपण सोपी ट्रीक जाणून घेणार आहोत.


सर्वप्रथम तेलाचं प्रमाण जास्त झाल्याने चकल्या कुरकुरीत होत नाही हे लक्षात ठेवा.


तसेच धान्य चांगले भाजले असेल तरच चकल्या कुरकुरीत होतात.


तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मूगाची डाळ, तिखट, हळद, ओवा, पांढरे, तीळ, चकली मसाला, तेल, मीठ एकत्र करा.


तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मूगाची डाळ मंद आचेवर भाजून घ्या.


एका भांड्यात पाणी उकळून घ्या आणि त्यात दळलेल्या पीठात हळद, ओवा, पांढरे तीळ, मीठ, चकली मसाला तिखट आणि मोहन तेल टाका.


गरम पाण्याने हे पीठ मळून चकलीच्या साच्यात भरा आणि चकल्या पाडा. मंद आचेवर चकल्या तळून घे.


चकलीत मोहन तेल योग्य प्रमाणात टाका. चकल्या नेहमी मंद आचेवर तळा.


आता तुमच्या चकल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतील. तुमच्या प्रियजनांना चकल्या कश्या झाल्या? नक्की विचारा

VIEW ALL

Read Next Story