पंतप्रधानांना परदेश दौरा करण्यासाठी Visa ची आवश्यकता असते का?

Published by: Zee Team | Aug 17, 2025

पंतप्रधान हे देशातील एक महत्वाचं पद आहे. अनेकदा पंतप्रधानांना विविध कारणांसाठी परदेश दौरा करावा लागतो.

Published by: Zee Team | Aug 17, 2025

सर्वसामान्य नागरिकांना परदेशात जायचं असेल तर त्या त्या देशातील व्हिसा घ्यावा लागतो. पण पंतप्रधानांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असते का? याबाबत जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Aug 17, 2025

भारताच्या पंतप्रधानांकडे एक विशेष पासपोर्ट असतो. ज्याला 'डिप्लोमॅटिक पासपोर्ट' असं म्हणतात.

Published by: Zee Team | Aug 17, 2025

'डिप्लोमॅटिक पासपोर्ट' हे भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना किंवा अधिकृत परदेश दौऱ्यांसाठी डिप्लोमॅट्सना दिले जाते. डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारकांना कोणत्याही देशात प्रवास करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नसते.

Published by: Zee Team | Aug 17, 2025

भारताचं डिप्लोमॅटिक पासपोर्ट हे मरून रंगाचं असतं. याची व्हॅलिडिटी 5 वर्ष असते.

Published by: Zee Team | Aug 17, 2025

या पासपोर्टसह प्रवास करणाऱ्यांना काही देशांमध्ये सीमाशुल्कात सूट, जलद इमिग्रेशन प्रक्रिया आणि विशेष प्रोटोकॉल सुविधा मिळतात.

Published by: Zee Team | Aug 17, 2025

VIEW ALL

Read Next Story