दाहकता सहन करा

'सुर्यासारखं तळपायचं असेल, तर आधी त्याच्याइतकी दाहकता सहन करा.'

आभाळाकडे पाहा...

'आभाळाकडे पाहा, आपण एकटे नाही आहोत. संपूर्ण विश्व आपल्याशी मैत्रीचं नातं जपतंय आणि जे प्रयत्न करत कष्ट करताहेत त्यांना उत्तमोत्तम मार्गातून परतफेड करण्याचा प्रयत्न करतोय.'

एककेंद्री वृत्ती

'ध्येय्य साध्य करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी तुम्ही त्याच्याप्रती एककेंद्री वृत्ती ठेवली पाहिजे.'

एक उत्तम ध्येय्य

'एक उत्तम ध्येय्य, ज्ञान मिळवण्याची क्षमता, प्रचंड मेहनत आणि चिकाटी या चार गोष्टींचं पालन केल्यास कोणतंही यश मिळवता येतं.'

परमोच्च शिखर

'कोणत्याही क्षेत्रात परमोच्च शिखरावर पोहोचायचं असल्यास कमालीच्या ताकदीची गरज असते. मग ते माऊंट एव्हरेस्टचं शिखर असो किंवा तुमच्या कारकिर्दीतील शिखर.'

पहिल्यावहिल्या यशानंतर...

'पहिल्यावहिल्या यशानंतर कधीच विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या पायरीवर तुम्ही अपयशी ठरलात तर पहिलं यश हा नशिबाचाच भाग होता असं म्हणणारी अनेक तोंडं असतील.'

वेगळेपण

'वेगळेपण सिद्ध करण्यासाठी अंतिम यशशिखरावर पोहोचेपर्यंत वेळोवेळी इतरांच्या कल्पनाशक्तीशीच तुमचा लढा असेल.'

... ते स्वप्न नसतं

'मिटलेल्या डोळ्यांनी पाहता ते स्वप्न नसतं; स्वप्न म्हणजे एक अशी गोष्ट जी तुम्हाला झोपूही देत नाही.'

निर्धारित ध्येय्य

'निर्धारित ध्येय्यावर पोहोचल्यानंतर थांबू नका; जीवनात ध्येय्य ठेवा, सतत ज्ञान ग्रहण करा, प्रचंड मेहनत करा आणि एका चांगल्या आयुष्याप्रती मेहनत घेत चिकाटीनं प्रयत्न करा.'

VIEW ALL

Read Next Story