भारतातील कोणत्या राज्यातील लोकं सर्वाधिक जास्त दारु पितात? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर?
केंद्रीय आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीतून याची माहिती समोर आली आहे.
राज्यसभेत डॉ. व्ही शिवदासन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने ही माहिती दिली.
2015-16 मधील एनएफएचएस 4 आणि 2019-21 एनएफएचएस-5 मधील दारु संदर्भातील आकडेवारीनुसार हा अहवाल देण्यात आला.
आकडेवारीनुसार, भारतातील सर्वाधिक दारु गोवा राज्यात प्यायली जाते. येथे बियर सर्वात स्वस्तात मिळते. गोवा पार्ट्यांसाठीदेखील ओळखली जाते.
गोव्यानंतर या यादीत अरुणाचल प्रदेश, तेलंगणा, झारखंड, सिक्किम, छत्तीसगड, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, पजांब, आसाम, केरळ आणि बंगाल यांचा समावेश आहे.
गोव्यात 59.1 टक्के पुरुषांसह मद्यपान केले जाते. अरुणाचल प्रदेशमध्ये 56.6 टक्के, तेलंगणामध्ये 50 टक्के, झारखंडमध्ये 40.4 टक्के मद्यपान केले जाते.
ओडीसामध्ये 38.4 टक्के, सिक्कीममध्ये 36.3 टक्के यानंतर छत्तीसगड 35.9 टक्के, तामिळनाडू 32.8 यांचा क्रमांक लागतो.
उत्तराखंडमध्ये 32.1 टक्के, आंध्र प्रदेशमध्ये 31.1 टक्के, पंजाबमध्ये 27.5 टक्के, आसाममध्ये 26.5 टक्के, केरळमध्ये 26 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 25.7 टक्के लोक दारुचे सेवन करतात.
2015-16 मध्ये बिहारमधील 28.9 टक्के पुरुष दारु पित होते. आणि आजही 17 टक्के पुरुष दारु पितात.