भारतात का आयात केला जातोय 'हा' चकाकणारा मासा? जाणून घ्या महत्त्वं...
येत्या काही दिवसांमध्ये दुर्गापुजेचं निमित्त साधत भारतात तब्बल 4000 मेट्रीक टन इतका हिल्सा मासा निर्यात करण्याला बांगलादेश सरकारनं परवानगी दिली आहे.
परिणामी, पश्चिम बंगालच्या खाद्यसंस्कृती अविभाज्य भाग असणाऱ्या या हिल्सा माशाची भारतात आयात होणार आहे. बांगलादेशमधील 79 व्यावसायिक संस्थांकडून या माशाची निर्यात होणार आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे बांगलादेशमधील हिल्सा माशावर जीआय टॅगही आहे. या देवाणघेवाणीतून भारतातून तीस्ता नदीच्या पाण्याच्या समान वाटपाचा हेतूही बांगलादेश साधू पाहणार आहे.
आता तुम्ही म्हणाल हा मासा इतका महत्त्वाचा का? तर जाणून घ्या त्याच्या पोषक तत्त्वांविषयी...
हिल्सा हा एक गोड्या पाण्यातील मासा असून, त्यामध्ये स्निग्ध घटकांचा भरणा आहे. या माशामध्ये अनेक पोषक तत्त्वं आहेत.
हिल्सा माशाच्या 100 ग्रॅम तुकड्यामध्ये 310 कॅलरी, 25 ग्रॅम प्रोटीन (प्रथिनं) आणि 22 ग्रॅम फॅट्स (चरबी) असते.
दैनंदिन स्वरुपात हिल्सा माशाच्या सेवनामुळं शरीलाला 27 टक्के व्हिटामिन C, 2 टक्के लोह आणि तब्बल 204 टक्के कॅल्शियम पुरवलं जातं.