यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, हा एकमेव उद्देश असतो. एका व्यक्तीचे एकाच वेळी दोन ते तीन जणांशी द रिपिट ऑफेंडर सेक्स एडिक्ट अफेयर सुरू असतं. या अफेयरमध्ये कुणाच्याही भावनांशी काही घेणं देणं नसतं.
द लव्ह एडिक्ट अफेयरमधील पुरुष किंवा महिला तिच्या वैवाहिक जीवनात असंतुष्ट असते. आपल्याला चुकीचा जोडीदार मिळाला, असं त्याला कायम वाटत असतं. अशा हे अफेयर सुरु होतं. अशा अफेयरमध्ये शारीरिक आणि भावनात्मक नातेसंबंध जपले जातात.
विवाह बंधनातून स्वेच्छेने मुक्त होण्यासाठी पुरुष-महिला द एक्झिट स्ट्रॅटेजी अफेयर प्रस्थापित करतात. विशेष म्हणजे, असे लोक आपले विवाहबाह्य संबंध स्वतः जाहीर करतात. जोडीदाराने आपल्याला सहज सोडून द्यावे, हा या मागील उद्देश असतो.
सध्याच्या आधुनिक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात दी सायबर अफेयर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. यात फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. अशा अफेयरमध्ये भावनात्मक, सेक्सुअल आणि अश्लिल विचारातून उत्तेजना मिळत असते.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचा हा सर्वात जास्त धोकादायक प्रकार आहे. काही विवाहित महिला-पुरुषांना त्यांच्या जोडीदारापासून असुरक्षिततेची भावना निर्माण होत असते. याच भावनेतून द रिव्हेंज अफेयर बनत असतात. महिला-पुरुष त्यांच्या इच्छेनुसार फायदा घेत असतात.
आम्ही एक्सिडेंटली भेटलो, आमच्या एक्सिडेंटली अफेयर झालं, असं काही महिला-पुरुष सांगत असतात. यात भावनांना महत्त्व दिलं जात नाही तर शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, हा प्रमुख उद्देश असतो.
चालणं, बोलण्यावर इम्प्रेस होऊन काही विवाहित पुरुष हे पर स्त्रीकडे आणि महिला या पर पुरुषाकडे आकर्षित होत असतात. या अफेयरला रोमॅंटिक अफेयर विथ अटॅचमेंट असं म्हटलं जातं. या अफेयरमध्ये बहुतांश महिला-पुरुषांचा शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, असा उद्देश असतो.
विवाहबाह्य संबंधाला खास मैत्रीतून सुरूवात होते. त्यात भावना म्हणजे इमोशनला प्राधान्य दिलं जाते. ऑफिसात आपल्या सहकाऱ्यासोबत इमोशनल अफेयर होण्याची जास्त शक्यता असते. सिम्पली हायर्डच्या सर्वेक्षणानुसार,यामध्ये शारीरिक संबंध गरजेचे नसते तर भावनात्मक नातं यात जपलं जातं.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर म्हणजे विवाहबाह्य संबंध. हे विवाहबाह्य संबंध 8 प्रकारचे असतात. विवाहीत पुरुष किंवा महिला तेव्हा बाहेर अनैतिक संबंध ठेवतात तेव्हा त्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर असं म्हणतात.