भारतात अशी कैक ठिकाणं आहेत जी तिथं जाणाऱ्या प्रत्येकाला तिथंच रोखून धरण्याच्या सामर्थ्यानं परिपूर्ण आहेत.
असंच एक कमाल ठिकाण म्हणजे जणू महाराष्ट्रातील कास पठाराचा मोठा भाऊच. ज्याप्रमाणं कास पठारावर दरवर्षी फुलांचा बहर येतो तसाच बहर इथंही येतो, पण तो इतका मोठा... की पाहणारे थक्कच होतात.
हे ठिकाण म्हणजे उत्तराखंडमधील 'फुलों की घाटी' किंवा 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'. या ठिकाणी उगवणाऱ्या वनस्पतींपासून औषधंही बनवली जातात असं सांगण्यात येतं.
ट्रेकिंगच्या वाटांवर जाणाऱ्यांसाठीसुद्धा उत्तराखंडमधील हे ठिकाण एक उत्तम पर्याय.
साधारण 87.50 चौरस किमी च्या क्षेत्रावर असणाऱ्या या विस्तीर्ण भागामध्ये सुमारे 500 हून अधिक प्रजातीची बहुरंगी फुलं पाहायला मिळतात.
इथं येणाऱ्या पर्यटकांना इथं थांबण्यास/ मुक्काम करण्यास मात्र परवानगी दिली जात नाही.
यंदाच्या वर्षी ही व्हॅली इथं येणाऱ्यांसाठी 1 जूनपासून सुरू झाली असून, पुढील काही महिने ती इथं येणाऱ्या प्रत्येकाचच स्वागत करण्यास सज्ज असेल.