आज आम्ही तुम्हाला पंखा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
सर्वात आधी पंखा बंद करा आणि पॉवर सॉकेटमधून काढा. यामुळे विद्युत अपघात होणार नाही.
त्यानंतर ओल्या कपडा घ्या. यामध्ये तुम्ही माइक्रोफाइबरचा कपडा तुम्ही घेऊ शकता.
पंखा साफ करण्यासाठी 1 कप विनेगर घ्या. त्यात 3 कप पाणी ओता. हे दोन्ही मिसळून घ्या.
याआधी पंख्याच्या पाते कोरड्या कापड्याने स्वच्छ करा. जर घाण जास्त असेल तर तुम्ही ब्रशने साफ करू शकता.
माइक्रोफायबर कपडा ओला करून त्याने तुम्ही पंख्याचे पाते हळूहळू स्वच्छ करा.
पंखा स्वच्छ झाल्यानंतर तो चालू करा. यावेळी पंखा नीट चालतो आहे का यावर लक्ष ठेवा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)