मेथीच्या दाण्यामध्ये 'हे' लपलेत अनेक आरोग्याचे फायदे

आश्चर्यकारक फायदे

Fenugreek Health Benefits : आपले आरोग्य ठणठणीत ठेवायचे असेल तर मेथीचे दाणे खाणे महत्त्वाचे आहेत. मेथीच्या छोट्या दाण्यांमध्ये लपले आश्चर्यकारक फायदे. याबाबत तुम्हाला काही माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.

आरोग्यासाठी फायदेशीर

मेथीचे दाणे दिसायला जरी छोटे असले तरी देखील त्यामध्ये असणारे गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अनेक वर्षांपासून मेथीचा अनेक आजारांवर उपाय करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मेथीचे दाणे केवळ आरोग्यावरच नाहीतर स्वयंपाकाकरता देखील त्याचा सर्रास वापर केला जातो. मेथी केसांसाठीही आरोग्यदायी आहे. मेथीचे पाणी केसांना लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रित

मेथीच्या दाण्यांमध्ये गॅलेक्टोमनन नावाचे तत्व असतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. मेथीमध्ये पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते. जे सोडियमचे परिणाम कमी करून हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित करते.

शुगर राहते नियंत्रित

मेथीमुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी हे एक वरदान आहे. मेथीमध्ये विरघळणारे फायबर गॅलेक्टोमन असते. जे रक्तातील साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करतात. याकरता मेथी चांगली भाजून त्याची पावडर तयार करा. ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा घ्या. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो.

लैंगिक समस्या दूर

मेथीमध्ये नियासिन, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी, लोह इत्यादी मुबलक प्रमाणात असते. यात डायोजेनिन नावाचे संयुग असते. जे सेक्स हार्मोन इस्ट्रोजेन वाढवण्याचे काम करते. यासोबत मेथी लैंगिक समस्या दूर करण्याचे काम करते. मेथीच्या बिया लैंगिक शक्ती वाढवतात. तसेच लैंगिक सहनशक्ती वाढवतात.

वजन कमी करण्यास मदत

मेथीचे दाणे वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. मेथी दाणे चांगले भाजून त्याची पावडर तयार करा. हे चूर्ण सकाळी कोमट पाण्यासोबत खावे. जर तुम्हाला मेथीची पावडर खाणे शक्य नसेल तर रिकाम्या पोटी भिजवलेल्या मेथीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण पोट बराच वेळ भरलेले राहते. यामुळे पोटाची चरबी जाळली जाते. त्यामुळे वजन कमी होते.

VIEW ALL

Read Next Story