आकाशात पक्षांचा थवा V आकारातच का उडतो?

आकाशात उडणारे पक्षी पाहाताना सुंदर वाटतं. संध्याकाळच्या सुमारास आपण अनेकवेळा पक्षी थवा करुन उडताना पाहिलं असेल.

पण तुम्ही निरखून पाहिलं तर आकातश पक्षांचा थवा 'व्ही' आकारातच उडताना पाहायला मिळतो.

तुम्हाला यामागचं कारण माहित आहे का? आता रिसर्चमधून पक्षी व्ही का उडतात यामागचं कारण समोर आलं आहे.

याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे व्ही शेपमध्ये उडण्याने त्यांना उडणं सोपं जातं. तसंच यामुळे पक्षांची आपसात टक्कर होत नाही.

दुसरं कारण म्हणजे रिसर्चमधून असं समोर आलं आहे की पक्षांच्या थव्यात एक लीडर पक्षी असतो. तो उडताना इतर पक्षांना मार्गदर्शन करतो.

अंधार पडत आल्यावर पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेने उडतात. यावेळी लीडर पक्षी सर्वात पुढे राहून मार्ग दाखवतो. बाकी पक्षी त्याच्या मागे उडत असतात.

लंडन विश्वविद्यालयाच्या रॉयल व्हेटरनरी कॉलेजच्या एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे. एकत्र उडत असल्याने पक्षी स्वत:ला सुरक्षित मानतात.

VIEW ALL

Read Next Story