हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत आपण पाहिलं असेल समुद्री डाकूंच्य एका डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. काळ्या रंगाची ही पट्टी असते.

राजीव कासले
Oct 25,2024


हॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेला 'पायरेट्स ऑप द कॅरेबियन'मध्ये दाखवण्यात आलेल्या समुद्री डाकूंच्या एका डोळ्यावरही काळी पट्टी दाखवण्यात आली होती.


समुद्री डाकू अनेक महिने समुद्रातून प्रवास करत असतात. प्रवास करताना ते जहाजावर उभं राहून आसपासच्या सुरक्षेवर लक्ष ठेवत असतात.


सुरक्षा करत असताना अनेकवेळा ते जहाजावरुन डेकमध्ये जातात. जहाजाच्या डेकमध्ये काळोख असतो. उजेडातून अंधारात आणि अंधारातून उजेडात ते वारंवार ये-जा करतात.


मनुष्य उजेडातून अंधाराकडे जातो तेव्हा डोळ्यांची बुबुळं सामान्यपेक्षा जास्त मोठी होतात. असं होतं कारण डोळ्यांना जास्तीत जास्त प्रकाश मिळावा आणि ते अंधारातही व्यवस्थित बघू शकतील.


पण जेव्हा मनुष्य अंधारातून बाहेरच्या प्रकाशात येतो तेव्हा उजेडामुळे पटकन समोरची गोष्ट पाहाता येत नाही. डोळ्यांची उघडझाप होते.


त्यामुळे समुद्री डाकूंना एका डोळ्यावर पट्टी बांधण्याचा हा फायदा होतो. त्यांच्या एका डोळ्याला आधीच अंधारात राहण्याची सवय झालेली असते. दरोडा किंवा कोणत्याही हल्ल्याच्या वेळी ते डोळ्यावरची पट्टी बदलतात.


रात्री समुद्री डाकू आपल्या डोळ्यावरून पट्टी काढतात. कारण त्यावेळी चारही बाजूने अंधार असतो आणि डोळ्याच्या बुबुळांना जास्त काम करण्याची गरज पडत नाही.

VIEW ALL

Read Next Story