मुघल कालखंडात भारतात अनेक बादशाहांनी राज्य केलं. साधारण 16 ते 19 व्या शतकात मुघलांच वर्चस्व पाहायला मिळालं.
मुघलकालीन भारतीय इतिहासात डोकावलं असता लष्कर, कला आणि राजकारणाचे कैक संबंध आढळुन येतात.
हे तेच शासक होते ज्यांच्या कालखंडात मुघल साम्राज्याचा विस्तार झाला. पण, या साऱ्यांमध्ये सर्वाधित सुशिक्षित कोण होता माहितीये?
सर्वाधिक सुशिक्षित मुघल बादशाहा होता, औरंगजेब. आलिम बादशाह असंही त्याला संबोधलं जात.
तो कुरानचा हाफीज होता, ज्याला अरबी आणि फारसी भाषेचं ज्ञान होतं.
युद्धकलेसह घोडेस्वारी, तलवारबाजी आणि राजकारणातील कैक बारकावे त्यानं हेरले होते.
त्यानं एका व्यापक अभ्यासात सहभाग घेतला होता ज्यामध्ये शरीयत, सुन्नत आणि इस्लामी न्यायशास्त्राचे धडे देण्यात आले होते. (वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, त्यत विसंगती असू शकते. झी 24तास याची खातरजमा करत नाही.)