भारतात 1526 मध्ये बाबरनं मुघल साम्राज्याचा पाया रचला होता, जे साम्राज्य औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ढासळत गेलं. पण, मुळात 'मुघल' हा शब्द आला कुठून?
'मुघल' हा प्रत्यक्षातील हे फारसी शब्द आहे. हा शब्द एका मंगोल शब्दाचं रुपांतर म्हटलं जातं. भारतात येणाऱ्या मंगोल वंशज तुर्क मंगोल शासकांसाठी हा शब्द वापरला जात होता.
बाबर हा तैमूर लंगचा वंशज असून, त्याच्यासह त्याच्या कैक पिढ्यांचा जीवनकाळ तुर्कीमध्ये व्यतीत झाला होता. जिथं ते फारसी भाषा शिकले.
मुघलांनी त्यांच्या कार्यकाळात फारस इथून अनेक कारागिर बोलवून आपले मकबरे आणि महालांचं निर्माण करून घेतलं.
मुघलांनी फारसी भाषा, इस्लामी कला आणि प्रसासकीय व्यवस्थेशी हातमिळवणी केली, ज्यामुळं ते तुर्क- मंगोल परंपरांपासून वेगळे सिद्ध झाले.