भारतीय रेल्वेमध्ये ट्रेन उशिरानं येणं, वेळापत्रकातील वेळ अनेकदा चुकणं या तक्रारी बऱ्याचदा पाहायला मिळतात. एक राज्य असंही आहे, जिथं मात्र ट्रेन अगदी वेळेतच धावतात. माहितीये का हे राज्य?
भारतातील ते राज्य म्हणजे, राजस्थान.... आश्चर्य वाटतंय ना? राजस्थानच्या पाच डिव्हीजन रेल्वेच्या वेळा अगदी तंतोतंत पाळत पंक्चूअलिटी रेटमध्ये आघाडीवर आहे.
जयपूर रेल्वे स्थानकात ट्रेन 99.9 टक्के वेळेत धावतात. यामागोमाग बिकानेरचं नाव येतं.
राजस्थानातील अजमेर, जोधपूर आणि कोटा या स्थानकांमध्येही रेल्वेच्या वेळांचं पालन होतं.
राजस्थानमागोमाग रेल्वेच्या वेळेचं पालन करणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशचा समावेश होतो.
उत्तर प्रदेशातील इज्जतनगर, आग्रा आणि पंडित दिनदयाल उपाध्याय या डिवीजनचा यात समावेश आहे.