भारतात सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये रेल्वे सर्वाधिक लोकप्रिय असून देशाच्या कानाकोपऱ्यात ही रेल्वे पोहोचली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
या रेल्वेनं दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवासी प्रवास करतात. पण, याच रेल्वेसंदर्भातील काही गोष्टी अगदी सराईत प्रवाशांनाही ठाऊक नाहीत. अशी एक गोष्ट जगातील सर्वात लहानग्या रेल्वे स्थानकाची.
भारतात असणाऱ्या या जगातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाचं नाव इतकं लहान आहे की ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अवघ्या दोन अक्षरांमध्ये हे नाव लिहिलं जातं.
ओडिशा इथं हे रेल्वे स्थानक असून, त्याचं नाव आहे इब. इंग्रजीत लिहायचं झाल्यासही हे नाव IB इतकंच लिहिलं जातं. ओडिशातून पुढे जाणाऱ्या महानदीच्या उपनदी इबवरून या रेल्वे स्थानकाला नाव देण्यात आलं आहे.
ओडिशातील झारसुगुड़ा जिल्ह्यात असणारं हे रेल्वे स्टेशन बिलासपूर डिव्हीजनचा एक भाग आहे.
इथं दोन मुख्य फलाट आहेत. हे स्थानक 1891 पासून प्रवाशांच्या सेवेत असून 134 वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेत आहे.