भारतातील अगदी सगळ्यांकडेच त्यांचे आधार कार्ड आहे. ती एक आपली ओळख बनली आहे.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सगळ्यात आधी कोणाचे कार्ड बनले असेल?
जर तुम्हाला माहित नसेल तर आज तुम्हाला उत्तर कळेल.
रंजना सोनवणे या महिलेचं सगळ्यात पहिले आधार कार्ड बनवण्यात आले होते.
रंजना ही महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभळी गावची रहिवासी आहे.
29 सप्टेंबर 2010 रोजी त्यांना भारतातील पहिले आधार कार्ड मिळाले.
हे आधार कार्ड त्यांना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून मिळाले होते.