दर दिवशी, या न त्या कारणानं सर्वजण चलन हाताळतात. या चलनातील नोटेवर एक फोटो कायमस्वरुपी पाहायला मिळतो तो म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा.
पण, महात्मा गांधी यांच्याआधी नोटेवर कोणाचा फोटो छापला जायचा माहितीये? जाणून आश्चर्य वाटेल पण, त्या काळात नोटेवर ब्रिटनचे राजा जॉर्ज सहावे यांचा फोटो छापला जात होता.
भारत स्वतंत्र्य झाल्यानंतर मात्र नोटेवर असणारा हा फोटो बदलण्यासाठीची योजना आखण्यात आली मात्र ती अंमलात आणण्यास काही वेळ दवडला गेला.
1949 मध्ये किंग जॉर्ज यांच्या फोटोऐवजी सारनाथ येथील अशोकस्तंभाचा फोटो वापरण्यात आला. 1969 मध्ये पहिल्यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेनं नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो वापरला.
तेव्हाच्या नोटेवर सेवाग्राम आश्रमात बसलेल्या महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला होता.
पुढे 1987 पासून प्रत्येक नोटेवर महात्मा गांधी यांचा आनंदी मुद्रा असणारा फोटो नोटेवर छापण्यात आला.