देवाच्या दर्शनासाठी मंदिरात बऱ्याचदा जाणं होतं. मात्र या मंदिरात गेलं असता कधी त्याचा कळस निरखून पाहिला आहे का?
विविध कारणांनी अनेक मंडळी मंदिरांमध्ये जातात. तिथं असणारी सकारात्मकता सर्वांनाच भावते.
तुम्ही कधी मंदिरांचे कळस निरखून पाहिले आहेत का? सहसा त्यांचा आकार वर्तुळासम असतो. पण, यामागे नेमकं कारण काय माहितीये?
असं म्हणतात की मंदिराला असणारे हे काहीसे वर्तुळाकार कळस हवा नियंत्रित करण्याचं काम करतात. ज्यामुळं तेथील तापमान नियंत्रणात राहतं. वर्तुळाकार आणि शंखूसम कळसामुळे मंदिर भक्कम राहतं.
वास्तूशास्त्राच्या हिशोबानं विचार केल्यास वर्तुळाकाराला ब्रह्मांडाचं प्रतीक समजलं जातं. यामुळं वरच्या दिशेनं येणारी उर्जा आकर्षिक होते. हा आकार ध्यान आणि ध्यानात्मक उर्जेला वाव देतो.